विश्वास ठेवायचा कोणावर, कारवाही बाबत दिरंगाई
निर्भीडसत्ता न्यूज –
महापलिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे कामचुकार अधिकारी आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाही करतो असे सांगतात, परंतू ते प्रत्येक्षात काहीच करत नसल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे आयुक्त खोटे बोलत असल्याचे उघड झाले आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्नालयासमोर बेकायदेशीरपणे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांचे चौकशीचे आदेश दिले होते, त्याचे पुढे काहीच झाले नाही. महापलिका दैनंदिन डायरीमधे अक्षम्य चुका करणाऱ्या प्रशासन अधिकारी यांना नोटीस बजावून चौकशी करुण कारवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते, प्रत्यक्षात काहीच केलेले नाही. तसेच शहरातील हॉटेल चालकांचे सर्वेक्षण करुण कारवाही करू असे आदेश दिले होते, प्रत्यक्षात त्याचे काहीच झाले नसल्याचे आयुक्तानी मान्य केले आहे. त्यामुळे आयुक्त जर खोटे बोलत असतील तर जनतेने विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.