निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेतील कर्मचा-यांना अनुभवानुसार बढत्या दिल्या जातात. पदोन्नती समितीच्या बैठकीत बढत्या देण्याचे आयुक्त निश्चित करतात. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ३० जानेवारी २०१८ रोजी पदोन्नती सभा घेतली. कर्मचा-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, गोपनीय अहवाल, सेवा ज्येष्ठता, मत्ता, दायित्व, आरक्षण आणि शिस्तभंग विषयक कारवाई आदींची सेवाविषयक तपशील पडताळून कर्मचा-यांना बढत्या देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० लिपिकांना मुख्य लिपिक पदावर बढती देण्यात आली. ड संवर्गातील तीन कर्मचा-यांना लिपिक पदावर बढती देण्यात आली.
तिघांना लेखापाल पदावर बढती देण्यात आली असून एका महिला कर्मचा-याला कार्यालयीन अधीक्षक पदावर बढती देण्यात आली. तीन कर्मचा-यांना भांडारपाल पदावर बढती दिली आहे. दोघांना लेखाधिकारी पदी बढती देण्यात आली. तर, तीन सुरक्षा कर्मचा-यांना सुपरवायझरपदी बढती दिली आहे. तसेच, महापालिका सभेत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी बढत्या दिलेल्या सहा डॉक्टरांचे आणि तात्पुरत्या स्वरुपात दोन डॉक्टरांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी बढत्या दिल्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी काढले आहेत.