निर्भीडसत्ता न्यूज –
आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ जलवाहिनी फुटल्याने शनिवारी (दि.१०) थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी, कुणाल आयकॉन परिसर, पिंपळे निलख, कस्पटेवस्ती या भागात विस्कळीत पाणीपुरवठा होणार आहे.
निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून थेरगावकडे जाणारी जलवावाहिनी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी सकाळी फुटली. तिथे तातडीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे ही जलवाहिनी बंद राहणार आहे. त्याव्दारे पाणीपुरवठा होणा-या थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी, कुणाल आयकॉन परिसर, तसेच पिंपळे निलख, कस्पटेवस्ती या भागातील पाणीपुरवठा शनिवारी विस्कळीत राहणार आहे. नागरीकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका पाणीपुरवठा