निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिका ज्येष्ठ नागरिक, अपंगांच्या धोरणानंतर शहरातील खेळाडूंसाठी सुधारित क्रीडा धोरण करणार आहे. त्याअंतर्गंत शहरातील क्रीडांगणे, मैदानांचा योग्य वापर आणि खेळाडूंची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील क्रीडा क्षेत्र व खेळाडूंसाठी सुधारित क्रीडा धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत एकनाथ पवार म्हणाले की, नुकतीच महापालिका पदाधिकारी, अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची संयुक्त बैठक घेण्यात आली.
त्या बैठक धोरण करण्यावर चर्चा झाली. शहात १२८ व्यायामशाळा, अनेक क्रीडांगणे, मैदाने आहेत. त्याचा योग्य वापर होत नसल्याचे पालिकेचा महसूल बुडतो. त्यातून महसूल निर्मिती करण्याचा प्रयत्न राहील. काही क्रीडा शिक्षक मागील आठ वर्षांपासून दुसरीकडे काम करत आहे. त्यांना क्रीडा शाळेत नेमून चांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच हे धोरण तयार केले जाईल, असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.