निर्भीडसत्ता न्यूज –
प्रत्येक समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे, सध्या स्पर्धेचे युग असून समाजातील प्रत्येक गरजू घटकाला यात सामावून घेणे आवश्यक आहे. असे मत पिंपरी चिंचवड शहराचे महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून “पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशन”च्या वतीने नुकताच महिला दिन पुरुषांनी साजरा केला, त्यावेळी महापौर काळजे बोलत होते.
पिंपरीतील एका हॉटेल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव यावेळी करण्यात आला.
शहराचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष पदमनाभ शेट्टी, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, कार्याध्यक्ष राकेश नायर, सरचिटणीस सुनील गोपीनाथ, भालचंद्र शेट्टी, राकेश शेट्टी, कार्तिक कृष्णा, गणेश आंचन, प्रसाद नायर, राजेंद्र प्रसाद यांच्यसह दक्षिण भारतीय यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. या दक्षिण भारतीय समाजाचे संघटन होण्यासाठी एकत्रित आले पाहिजे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी महापौर काळजे यांनी दिले.
असोसिएशनचे अध्यक्ष पदमनाभ शेट्टी म्हणाले की, समाजाचे संघटन होण्यासाठी “पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशन”ची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम साऊथ इंडियन असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे. अशावेळी समाजातील संघटनामुळे गरजू घटकापर्यंत पोहचता येणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी संघटन मजबूत असावे असे मत व्यक्त केले.
यावेळी पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशन माध्यमातून सात महिला बचत गट स्थापन करण्यात आले. त्याचे उदघाटन उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला हजारो दक्षिण भारतीय नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि स्वागत राकेश नायर यांनी केले. सुत्रसंचालन अभिलाष संविधान यांनी केले. आभार राकेश शेट्टी यांनी मानले.
पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन असोसिएशनच्या वतीने महिलांना ‘पंचरत्न’ पुरस्कार देवून सन्मान
“पंचरत्न” पुरस्काराने ७२ वयवर्षे असलेल्या सामाजिक क्षेत्रातील भारती शेट्टी, सामाजिक आणि राजकीय दिघा उदयकुमार, कला क्षेत्रातील सुजा दिनकर, वैधकीय डॉ. प्रिया नायर आणि शैक्षणिक दीपा बसीन यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.