निर्भीडसत्ता न्यूज –
युवा शक्ती फाऊंडेशन च्या ‘स्किल डेवलपमेंट’ कार्यालयास राज्याचे कामगार व कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांनी चिखली येथील पूर्णानगर येथे नुकतीच भेट दिली. युवा शक्ती फाऊंडेशन ‘स्किल डेवलपमेंट’ च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
युवा शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष एकनाथ पवार, संचालक विक्रमादित्य पवार, ऐश्वर्या पवार, सतिश पवार, संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कौशल विकास व उद्योजकता, कामगार, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी युवा शक्ती फाऊंडेशन च्या ‘स्किल डेवलपमेंट’ चे अध्यक्ष व सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी वार्तालाप केला.
युवाशक्ती फाऊँडेशन ग्रुप गेल्या दहा वर्षापासून सांस्कृतिक मनुष्यबळ सेवा, ट्रेनिंग तसेच प्रशिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ग्रामीण शहरी भागातील तरुण वर्गाला रोजगार कौशल्य प्रशिक्षण व नोकरी मार्गदर्शन प्रदान करणे व व्यावसायिक विकासावर प्रशिक्षण देने या माध्यमातून युवाशक्ती फाऊँडेशन काम करत आहे.
संस्थेच्या महाराष्ट्र तसेच भारतात इतर राज्यात एकूण 12 शाखांच्या माध्यमातून रोजगार व कौशल्य विकासावर आधारित उपक्रम चालू आहेत. ‘कमवा व शिका’ ही महाराष्ट्र राज्याची योजना तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांची ‘राष्ट्रीय क्षमता वृद्धी मिशन’ ((NEEM)) च्या माध्यमातून भारतभर तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी ‘ऑन जॉब’ ट्रेनींगच्या माध्यमातून अनेक तरुणांना भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये पाठविले जाते. हे सर्व उपक्रम राबविताना विध्यार्थींकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्किल इंडिया मिशन’ साठी फाऊँडेशन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतातील वेगवेगळ्या शाखांना व कंपन्या यांना समन्वय साधण्यासाठी पिंपरी चिंचवड येथे युवाशक्ती फाऊंडेशनचे मुख्य कार्यालय आहे.