निर्भीड न्यूज –
पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे कामगारदिनानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, रांजणगाव, चाकण, खेड आणि शिरवळ एमआयडीसीतील सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
रविवार, दि. 1 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथून खंडोबा माळ, एसकेएफ कंपनीमार्गे चिंचवडगाव, लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड स्टेशन, मोरवाडी ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात या रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे.
कैलास कदम (इंटक), माधव रोहम (आयटक), अजित अभ्यंकर (सिटू), ॲड. म. वि. अकोलकर (एनएफआयटीयू), ॲड. राम शरमाळे (हिंदू मजदूर सभा), अर्जून चव्हाण (भारतीय मजदूर संघ), अनुराधा आठवले (महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस फेडरेशन), समीर धुमाळ (अध्यक्ष टाटा मोटर्स), विष्णूपंत नेवाळे, सुरेश जासूद, संजय काळे (टाटा मोटर्स), जयसिंग पोवार (बीकेएस), भरत शिंदे (फोर्स मोटर्स कामगार परिवार), इरफान सय्यद (माथाडी आणि जनरल कामगार संघटना), सुनील पाटसरकर (सरचिटणीस, एचए कंपनी), यशवंत सुपेकर (सरचिटणीस, हिंद कामगार संघटना) आदी उपस्थित राहणार आहेत.
या दुचाकी रॅलीमध्ये इंटक, आयटक, सिटू, एसएमएस, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, बीएमएस, विमा कामगार संघटना, पुणे, फोर्स मोटर्स कामगार परिवार, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना, श्रमिक एकता महासंघ, ऑर्डनन्स फॅक्टरी वर्कर्स युनियन, युटीयूसी, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामागर युनियन, आयडीइएफ, एनएफटीइ, टेल्को एम्प्लॉईज युनियन, पीएमटी संघ (इंटक), केंद्र सरकार कामगार व कर्मचारी महासंघ, टीयूसीएसी, बीकेएस, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज, बीएसएनएल, बेफी, हिंद कामगार संघटना, बँक कर्मचारी संघ (इंटक), कर्मचारी अधिकारी मध्यवर्ती महासंघ पुणे, एलपीएफ, एलआयसी, एचए मजदूर संघ, विविध अंगणवाडी व घरेलू महिला कामगार संघ, आयएफटीयू, एआयबीए, एआयसीसीटीयू, एआययूटीसी, महाराष्ट्र सर्व श्रमिक महासंघ पुणे आदी कामगार संघटनांच्या प्रतिनिधी व कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.