निर्भीड न्यूज –
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे वा. ना. अभ्यंकर यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. महापौर शकुंतला धराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे याबाबत माहिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या माध्यमातून पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड देऊन विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी अभ्यंकर प्रयत्नशील आहेत. गुरुकुल आणि क्रीडाकुल निर्माण करणारे वा. ना. अभ्यंकर हे मराठी भाषेचे अग्रणी प्रसारक, संस्कृत भाषेचे व्यासंगी अभ्यासक आहेत.
ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला संपूर्ण जीवन समर्पित करणा-या व निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीमध्ये अध्यापक ते प्राचार्य व नंतर संस्थेचे कार्यवाहक म्हणून जबाबदारी पेलणारे वा. ना. अभ्यंकर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महापालिकेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दि. 1 मे 2016 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या प्रांगणात अभ्यंकर यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.