निर्भीडसत्ता न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केलेल्या देहुरोड येथील ऐतिहासिक बौध्द विहाराच्या सुशोभिकरणासाठी राज्य शासनाने 51 लाखांचा निधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी (दि.4) घेतला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 जयंती वर्षानिमित्त ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार एकूण 28 ठिकाणांची यादी तयार करण्यात आली होती. त्या यादीत देहूरोड येथील ऐतिहासिक बौध्द विहाराचा समावेश केला आहे.
या बौध्द विहाराचे नूतनीकरण व सुशोभिकरणाचे काम शासनाकडून केले जाणार आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून त्याच्या प्रस्तावानुसार या कामासाठी शासनाने 51 लाख 20 हजार रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.