निर्भीडसत्ता – चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे उद्घाटनाआधी शहरातील मातंग समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि बारा बलुतेदार संघटनांच्या वतीने नामकरण करण्यात आले. महापालिकेने ठरविलेल्या संत मदर तेरेसा यांच्या नावाऐवजी क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव पुलाला देण्यात आले.
यावेळी मातंग समाजाचे नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, युवराज दाखले, धनंजय भिसे, बाळासाहेब खंदारे, गणेश क्षिरसागर,बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल साठे, अण्णा कसबे, जय ससाने , राजु धुरंदरे, सतीष भवाळ ,संदिप जाधव ,राजु आवळे ,गणेश आडागळे, आभिजीत शिंदे, कुनाल सातव, नितीन वाटकर, संजय शेळके , अविनाश कदम, मंगेश नढे , गणेश साठे, दिपक लोखंडे, मयुर लोंढे, सुनिल मस्के, आविनाश शिंदे, राजु आवळे, सोमनाथ वायंदडे, मयुर लोंढे, गणेश लोंढे , आमोल तेलंगे, ळासाहेब बागुल, हनिफभाई पठाण, सचिन कांबळे, सोमनाथ साठे आदी उपस्थित होते.
शहरात इतर महापुरुषांची नावे अनेक प्रकल्पांना आहे. परंतु, लहुजी वस्ताद यांचे नाव नसल्याने या पुलाला त्यांचे नाव देण्याची आमची आग्रही मागणी होती, असे युवराज दाखल यांनी सांगितले आहे