पिंपरी-चिंचवड महिला आघाडीतर्फे खासदार वंदना चव्हाण यांचा सत्कार
निर्भीडसत्ता – खरे पाहता, राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुरदृष्टीमुळेच महाराष्ट्रात महिलांविषयक धोरणांची अंमलबजावणी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीत महिलांना योग्य आणि सन्मानपूर्वक काम करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.
पुण्यातून राज्यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची दुस-यांदा बिनविरोध निवड झाली. त्यांचा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने चित्रा वाघ यांच्या हस्ते चिंचवड येथे जाहीर सत्कार झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा धर, संगिता ताम्हाणे, माजी नगरसेविका शकुंतला भाट, माजी उपमहापौर रेखा गावडे, विश्रांती पाडळे, शहर संघटिका कविता खराडे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, फजल शेख, लता ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, युवती आघाडीच्या वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
वाघ म्हणाल्या की, राष्ट्रवादी महिला आघाडीने खासदार वंदना चव्हाण यांचा गौरव करून स्त्रि-शक्तीचा सन्मान केला आहे. राज्यातील राष्ट्रवादीच्या अन्य शाखांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे. यापुढील काळात लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महिला आघाडीने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार प्रत्येक प्रभाग, बुथ स्तरावर संघटन उभे करण्यावर भर दिला जाईल, असे वाघ यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना खासदार चव्हाण म्हणाल्या की, महिला आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाली की घरातुनसुध्दा हळुहळु मदत मिळू लागते. त्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निमार्ण करणे आवश्यक आहे. देशात सर्वप्रथम महिलाविषयक धोरण महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलात आले. शरद पवार यांच्या दुरदृष्टीमुळेचा सकारात्मक परिणाम आता पहायला मिळत असून अनेक महिला शासकीय सेवेत किंवा राजकीय क्षेत्रात उच्चपदावर पहायला मिळतात.
स्वागत वैशाली काळभोर, सुत्रसंचालन शिल्पा बिडकर, तर आभार मनिषा गटकळ यांनी मानले. मनिषा भिलारे, गंगातई धेंडे, वंदना पिंपळे, भक्ति टण्णू, पौर्णिमा पालकर, शिला भोंडवे, संगिता आहेर, वर्षा शेडगे, आशा शिंदे, पल्लवी पांढरे, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, दिपाली देशमुख आदिंनी संयोजनात सहभाग घेतला. तसेच यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या महिलांचे चित्रा वाघ यांनी स्वागत केले.