निर्भीड न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव बोट क्लबमध्ये पर्यटकांसाठी नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी या बोट क्लबचे उद्घाटन करण्यात आले. ‘सनी वाटर स्पोर्टस’च्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नगरसेविका झामाबाई बारणे, नीलेश बारणे, शिवसेनेचे शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे आदी या वेळी उपस्थित होते.
खासदार बारणे या वेळी म्हणाले की, निसर्गरम्य ठिकाणी उपलब्ध केलेल्या नौकाविहार सुविधेमुळे पर्यटनास प्रोत्साहन मिळेल.
सनी वाटर स्पोर्टसचे संचालक सनी सॅबेस्टीयन म्हणाले कि, बोट क्लबवर ४० सीटरची १ पवना क्रुझ १४ सीटर मोटर बोट , दोन व चार आसनी पैडल बोट वाटर स्कूटर, चार आसनी हायस्पीड बोट उपलब्ध असेल क्रूझबोटमध्ये नाष्टा व म्युझिक या सुविधा असतील रिक्रियेशनल कयाक, बनाना बोट राइड, बंपर बोट, झोर्बिंग बॉल असे जलक्रीडा प्रकारातील बोटस; तसेच साहसी मैदानी खेळांमध्ये बर्मा ब्रिज, फ्लायिंग फॉक्स, कमांडो नेट, व्हॅले क्रॉसिंग, धनुष्यबाण, रायफल शूटिंग, स्विमिंग व्हॅले क्रॉसिंग, झोर्बिंग बॉल, बंजी ट्राँपोलीन (मॅन्यूएल/मशिनाइज), इंफंटेबल क्लायंबिंग वाल यांचा यात समावेश असणार आहे.
थेरगाव बोटक्लबमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफगार्ड, लाईफबॅाय, लाईफजाकेट आहेत. शहराच्या वैभवात या पर्यटनस्थळाची भर पडणार आहे. यामुळे शहरातील पर्यटन वाढेल.