निर्भीडसत्ता –
पिंपरी-चिंचवडमध्ये अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी या पाट्यांविरोधात मोहीम उघडली आहे. मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १६) शहराच्या काही भागातील अमराठी पाट्या काढून टाकल्या.
शहरातील प्रत्येक दुकान तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयावर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, यासाठी मनसेच्या वतीने मध्यंतरी संबंधितांना निवेदने देण्यात आली होती. त्यानंतर आता शहरातील अमराठी पाट्या हटविण्यासाठी मनसेने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहराच्या काही भागातील दुकानांवर लावण्यात आलेल्या अमराठी पाट्या हटविल्या.
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये पक्षाचे शहर सचिव राजू पटेकर, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, रोहित काळभोर, प्रतीक काळभोर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.