निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे २३ कोटी ३ लाख ६६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील रोवेत सी.डी.वर्क पासुन ते वाल्हेकरवाडी चौकापर्यंत ३४.५ मी रूंदीचा रस्ता विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १४ कोटी १ लाख १७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे संत तुकाराम नगर प्रेक्षागृहाचे (अत्रे प्रेक्षागृह) नुतनीकरणाचे काम चालु आहे. सदर ठिकाणी वातानुकुलन यंत्रणेचे नुतनीकरणाचे कामांतर्गत नवीन वाढीव क्षमतेची वातानुकुलन यंत्रणा बसविण्यासाठी येणा-या सुमारे २ लाख १२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात लागू करण्यात येणा-या कर सवलत योजनाची मिळकत कर वसुली जनजागृती मोहिमेचा माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांना व्हावी या साठी शहरातील विविध रेडीओ स्टेशनवरून जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे त्या साठीच्या येणा-या सुमारे ९ लाख ३४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी व कासारवाडी येथील प्रशिक्षणार्थीसाठी बेंचेस साहित्य खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे १२ लाख ६७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. अग्निशामक विभागाचे अत्यावश्यक सेवेचा व संवेदनक्षम स्वरूपाचे कामकाज, तीन पाळ्यांमध्ये करण्याकरिता मानधनावर मासिक एकवट देण्यासाठी येणा-या सुमारे १८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.