निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यांनी या कार्यकारिणीत नऊ प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. या कार्यकारिणीत आणखी काही पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड करण्यात येणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदी सचिन चिखले यांची निवड केली. यापूर्वी चिखले यांच्याकडे दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. दहा दिवसांपूर्वी ठाकरे यांनी चिखले यांची संपूर्ण शहराच्या अध्यक्षपदी निवड केली. या निवडीनंतर चिखले यांनी पक्षाची शहर कार्यकारिणी तयार केली आहे. त्यामध्ये नऊ प्रमुख पदांवर कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
अंकुश तापकीर (उपशहराध्यक्ष, भोसरी विधानसभा), राजू साळवे (उपशहराध्यक्ष, चिंचवड विधानसभा), बाळा दानवले (उपशहराध्यक्ष, पिंपरी विधानसभा), विशाल मानकरी (विभाग अध्यक्ष, भोसरी विधानसभा), मयूर चिंचवडे (विभाग अध्यक्ष, चिंचवड विधानसभा), शाम जगताप (विभाग अध्यक्ष, चिंचवड विधानसभा), संजय यादव (विभाग अध्यक्ष, पिंपरी विधानसभा), दत्ता देवतरासे (विभाग अध्यक्ष, पिंपरी विधानसभा) आणि रुपेश पटेकर (शहर सचिव) यांचा कार्यकारिणीत समावेश आला आहे. या कार्यकारणीत आणखी काही कार्यकर्त्यांना लवकरच संधी देण्यात येणार असल्याचे चिखले यांनी सांगितले.