निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे मेट्रोचे पहिल्या टप्प्यात लाईनचे काम चालू आहे. या लाईन वर सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षा एजन्सी कडून पीएफ (भविष्य निधी) नंबर दिला जात नाही.
या लाईनची सुरक्षा व्यवस्था एटीआयटी (ATIT) ही सुरक्षा एजन्सी कडे आहे. या एजन्सीकडून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना पीएफ नंबर मिळत नाही त्यामुळं या सुरक्षा रक्षकांनी आपली व्यथा माध्यमाच्या प्रतिनिधीकडे मांडली. अनेक महिन्यांपासून हे सुरक्षा रक्षक काम करत असूनही पीएफ नंबर का दिला जात नाही असा प्रश्न विचारला असता, आमच्याकडे आहे फक्त इतकेच उत्तर मिळते. यामुळे कित्येक सुरक्षा करणारे कर्मचारी हे काम सोडून गेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मनात भीती आहे की जर आम्ही याविरोधात आवाज उठवला तर आम्हाला एक-एक करून सर्वांना कामावरून काढून टाकण्यात येईल
मेट्रो प्रशासनाला ही बाब लक्षात आली नाही. अश्या सुविधा न देणाऱ्या एजन्सीला काम दिलेच कसे ? आणि जर अश्या सुरक्षा एजन्सीला काम दिले असेल तर सुरक्षा कर्मचारी सुरक्षाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतील कसे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच त्यांना दिले गेलेल्या ओळखपत्रावर कामावर रुजू झालेली तारीख न टाकता नंतरच्या महिन्याची तारीख टाकली आहे. दिवसाचे 12 तास काम करून देखील साप्ताहिक सुट्टी मिळत नसल्याची व्यथा त्यांनी सांगितली. जर महिन्यातून एकदा सुट्टी घेतली तरी देखील त्या दिवसाचे वेतन मिळत नाही.
या सर्व प्रकारामुळे या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा एटीआयटी ही सुरक्षा एजन्सी घेत आहे. त्यांना आशा आहे की कोणीतरी आमची समस्या दूर करण्यासाठी पुढे येईल परंतु याची दखल मेट्रो प्रशासन घेईल का ? हे पाहणे गरजेचे आहे.