निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ऑड रिसर्च सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे आढळून येत आहे. रूग्णालयामध्ये येत असलेल्या गरिब व गरजू रूग़्णांची पिळ्वणूक रूग्णालय व्यवस्थापनाकडून होत आहे, तरी या रूग्णालयावरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपा पिंपरी चिंचवड अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी लेखी निवेदनाव्दारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ऑड रिसर्च सेंटर (ट्रस्ट नं. F-4245(PUN)) संत तुकारम नगर, पिंपरी येथे उपचराकरिता दरोरज अनेक रूग्ण रूग्णालयामध्ये दाखल होत असतात. सदर रूग्णालयामध्ये जीवनदायी योजना राबवितात परंतू योजनेचा लाभ गरजू, गरीब रूग्णांस मिळत नाही. रूग्णालयातील रूग्णांना मदत करण्यासाठी जीवनदायी विभागाची टिम कार्यरत असून ते रूग़्णास योग्य ती मदत करत नाही. रूग्णालयातील वैधकीय कर्मचारी रूग्णांना आपण योजनेत बसत नसल्यामुळे आपल्याला योजनेचा लाभ मिळू शकत नाही, असे बेशिस्तपणे उत्तरे देतात. रूग्णांना पैसे भरण्यास वैधकीय अधिकारी भाग पाडतात. त्यानंतर संबंधीत रूग्णांची केस संबंधीत योजनेत लावून त्याचा लाभ स्वताच्या खिशात घालतात. अशी अतिशय लाजिरवाणी प्रकारची बाब डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये सुरू आहे. यामुळे रूग्णांची पिळवणूक होत असून रूग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त होत आहेत. तसेच तिथे कार्यरत असलेले अधिकारी व संबधित रूग्णालयांचे वैधकीय अधीक्षक आपल्या कामाची कोणतीही जाबाबदारी घेत नसून दुसर्यावर सोपवतात.
डी. वाय. पाटील हॉस्पिटल मधील MSW टीम बेशिस्त आहे. MSW टीम मधील मार्गदर्शकांकडून रूग्णांस योग्य़ ती मदत होत नसल्याने दिसून येते. यामुळे गरीब रूग्णांची गैरसोय होत आहे. गरजू रूग्णांसाठी असणार्या शासनाच्या विविध योजनांचा MSW टीम कडून कसा लाभ घेता येईल याचे मार्गदर्शन करून रूग्णांची दिशाभूल करण्यात येत आहे. किडनी डायलिसिसच्य रूग्णास जीवनदायी योजनेतून जी औषधे मिळ्तात त्याचा लाभ रूग्णास न देता औषधे खासगी औषधालयामधून खरेदी करण्यास भाग पाडतात.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिक (PIL) क्र. 3132/2004 मधील दि. 7 ऑगस्ट 2006 व दि. 15 एप्रिल 2099 च्या आदेशानुसार योजनेतील क्र.8 हे स्ंबंधित रूग्णालयास लागू आहे. त्यांनी कार्यान्वित असलेल्या खाटांच्या संख्येपैकी 10 टक्के खाटा दुर्बल धटकांतील सवलतीच्या दरात आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. परंतु संबंधित रूग्णालयात कुठल्याही योजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येते.