निर्भीडसत्ता न्यूज –
रहाटणी पिंपळे सौदागर प्रभाग क्र.२८ मधील स्टॉर्म वाटर लाइन चेंबर साफ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी यांना या बाबत निवेदन दिले आहे.
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील स्टॉर्म वाटर लाइन
चेंबरमध्ये माती व कचरा साचल्यामुळे पावसाळ्यात रोडवरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रोडवर साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व स्ट्रोम वॉटर लाइन चेंबरची साफसफाई करून घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.