निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात एका न्यूज चॅनलचे प्रतिनिधी असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या दोन बोगस पत्रकारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. थेरगाव) आणि मोहमद शराफतहुसेन अली ( वय २४,रा.थेरगाव) असे या दोन बोगस पत्रकारांची नावे आहेत. वाकड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड शहरात ‘शबनम न्युज’ या नावाचे स्थानिक वाहिनी असून याच वाहिनीच्या पत्रकार (प्रतिनिधी) नसीम सादिक उस्मानी याने दिल्ली वरून एका सराईत गुन्हेगार असलेल्या मोहम्मद शराफतहुसेन अली याला पिंपरी-चिंचवड शहरात बोलावून घेऊन संगनमताने सोनसाखळी चोरण्याचे प्रकार सुरु केले.गेल्या चार महिन्यापासून ते पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करत आणि हे दोघेही दुचाकीवरून धूम ठोकत होते.या प्रकरणी वाकड पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते.वाकड पोलिसांच्या हद्दीत ऐकून पाच गुन्हे उघडकीस झाले असून त्यांच्याकडून सव्वाआठ तोळे सोन्याचे दागिने असा ऐकून २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.मोहम्मद अली यांच्यावर दिल्ली येथे सोनसाखळी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.