निर्भीडसत्ता न्यूज –
रहाटणी पिंपळे सौदागर प्रभाग क्र.२८ मधील स्टॉर्म वाटर लाइन चेंबर साफ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी यांना २ जुन या बाबत निवेदन दिले होते.त्या निवेदनाची दखल घेत महापालिकेने कामास सुरूवात केली आहे. त्यामुळे नगरसेवक नाना काटे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
संबंधीत अधिकार्याकडे पाठपुरावा करून पावसाळ्यापुर्वी रहाटणी पिपंळे सौदागर मधील सर्व
स्टॉर्म वाॅटर लाइन चेंबर साफ करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली. याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणले प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील स्टॉर्म वाटर लाइन चेंबरमध्ये माती व कचरा साचल्यामुळे पावसाळ्यात रोडवरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी रोडवर साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार होता. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी सर्व स्ट्रोम वॉटर लाइन चेंबरच्या कामाची साफसफाई सुरु करण्यात आली आहे.