निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरीतील हिंदूस्थान अँटिबायोटिक वसाहतीत ९ जून रोजी एका शिक्षिकेवर दुचाकीवरून आलेल्या अत्रातांनी गोळीबार केला. या खूनी हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. सुशील मंचरकर यांना काल (शुक्रवारी) सायंकाळी गवळीगाथा येथून अटक करण्यात आली आहे.
शीतल सिकंदर (वय ३५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या महिलेचे नाव आहे. या हल्यात हि महिला बचावली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ९ जून रोजी पिंपरीतील हिंदूस्थान अँटिबायोटिक वसाहतीत शितल सिकंदर या महिलेवर गोळीबार झाला होता. त्या महिलेने २०१४ मध्ये मंचरकर यांच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद दिली होती. गोळीबार प्रकरणी खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.