निर्भीडसत्ता न्यूज –
केबल टाकण्याच्या कामासाठी चुकीच्या पध्दतीने खोदाई केल्यामुळे मोठे झाड मुळे उखडून पडल्याचा प्रकार पिंपरीतील मोरवाडीमध्ये घडला. या प्रकाराबाबत खोदाई करणा-या संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मोरवाडी येथील रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू होते. हे काम करताना संबधितांनी जवळ मोठे झाड असताना त्याच्या मुळात खड्डा केला. त्या खड्ड्यामुळे हे झाड उखडून रस्त्यावर पडले. झाड तिथे उभ्या असलेल्या एका ट्रकवर पडल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत महापालिका उद्यान व खोदाईशी संबधित स्थापत्य विभागाच्या अधिका-यांना कसलीही माहिती नव्हती. या प्रकाराबाबत नगरसेवक तथा वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य तुषार हिंगे यांनी चुकीच्या पध्दतीने या भागात खोदाई करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.