निर्भीडसत्ता न्यूज –
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे विद्यानंद भवन हायस्कूलमध्ये डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 1300 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
निगडी येथे दोन दिवसीय चालणा-या या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यानंद भवन हायस्कूलच्या प्राचार्या छाया हब्बू, समन्वयक जया श्रीनिवास, प्रोजेक्ट लिडर शीतल म्हात्रे, प्राथमिकच्या प्राचार्या सविता किरण जे, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे बहार शहा, वसुधा गावडे आदी उपस्थित होते.
या शिबिरासाठी पुण्यातील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच सहकार्य मिळाले. त्यात नलिनी जाधव, ऋतुजा हिंगणे, मेघना कल्याणकर, निवेदिता चौधरी यांनी तपासणी केली. तत्पर्वी डोळ्यांची कशी घ्यावी काळजी, डोळ्यांचे स्वच्छ कसे राखावे याबाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांना एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्यावतीने डोळ्यांचे मोफत उपचार व चष्मे वाटप करण्यात आले.