पं. मनिषा साठे यांची नृत्यविषयक कार्यशाळा
निर्भीडसत्ता न्यूज –
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून चिंचवडच्या पायल नृत्यालयाच्या वतीने जगप्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु पंडिता मनिषा साठे यांच्या ‘नृत्यानुग्रह’ या कथक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पायल नृत्यालयाच्या संस्थापिका पायल गोखले यांनी चिंचवड येथे ही कार्यशाळा कथकनर्तकांकरिता आयोजित केली आहे. या कार्यशाळेत हस्तकामधील सौंदर्य आणि ततकारामधील स्पष्टता हा कार्यशाळेचा विषय असणार आहे.
गुरु पंडिता मनिषाताई यांचे नृत्याविषयीचे विचार, सृजनशीलता , उत्स्फुर्तपणा जाणून घेण्याची संधी या कार्यशाळेद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील कथकप्रेमींना मिळणार आहे. ही कार्यशाळा चिंचवडच्या घारेशास्त्री सभागृह येथे २८ आणि २९ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ८ वेळेत होणार आहे. कमीतकमी सहा वर्षे कथकप्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी या कार्यशाळेत सहभाग नोंदवू शकतात. अधिक माहितीकरिता ९८६०२०६२२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आ