निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेत चांगले काम करणारा अधिकार्यांस ‘ऑफीसर ऑफ मंथ’ पुरस्कार देण्याची संकल्पना स्थायी समितीने चार महिन्यांपूर्वी मांडली होती. अखेर आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
स्थायी समितीच्या झालेल्या सभेत अध्यक्षा ममता गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते लोणकर यांना सत्कार करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानात शहराचे स्थान 72 वरून 43 व्या क्रमांकावर आले आहे. त्यासाठी लोणकर यांनी उत्तम काम केले. तसेच, आषाढी वारी सोहळ्यात शहराची स्वच्छता ठेवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यात शहर सफाईस त्यांनी प्राधान्य दिले होते. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले. यापुढे दर महिन्यास ‘ऑफीसर ऑफ मंथ’ पुरस्कार दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.