क्रांतीवीर चापेकर स्मारक महिला विभागाचा उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
महिलाचा आवडता पोषाख म्हणजे साडी. या साडीमध्ये महिला वेगवेगळ्या प्रकारात कशा दिसतात. आपले रुप साडीत कसे दिसते यासाठी चिंचवडमधील क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या महिला विभागाच्यावतीने रंग माझा साडीत वेगळा हा उपक्रम शनिवारी घेण्यात आला. या उपक्रमात 130 महिलांनी सहभाग घेतला होता.
पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध ठिकाणांहून महिलांचा स्पर्धक व प्रेक्षक म्हणून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी समितीच्या उपाध्यक्षा शकुंतला बन्सल यांनी नगरसदस्या अश्विनीताई चिंचवडे ,विनयाताई तापकीर,रंजना नवले,मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी सविता गावडे,नूतन चव्हाण,रांगोळी कलाकार अंजली मेंनकुदळे असा अनुभव जवळपास सहाशे महिलांनी घेतला.निमित्त होते क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या महिला विभागातर्फे आयोजित विविध प्रकारच्या साड्या परिधान स्पर्धा म्हणजेच रंग माझा” साडीत”वेगळा हा उपक्रम खास महिलांसाठी घेण्यात आला होता.
स्पर्धकांनी पारंपारिक ,राज्यनिहाय ,विश्वनिहाय ,महाराष्र्टातील बारा बलुतेदार महिला,राज्यानुसार नववधूंच्या साड्या खास आकर्षण ठरले. भारतीय साडी पाश्चिमात्य पेहरावातही कशी नेसता येते हे देखील तालवृंद गटाने सादर केले.नांदा सौख्य भरे या गटाने सासूची पारंपारिक तर सुनेची अत्याधुनिक साडी पेहराव केल्याने स्टेजवर एकत्रित अालेल्या सासू सुनांपैंकी सासवाच जास्त भाव खावून गेल्या.एराज् ऑफ बॉलिवूड थीम मधील स्पर्धकांनी चित्रपट सृष्टीचा जुना कालखंडच उलगडून दाखवला.डायमंड गटातील प्लेन साड्यांच्या विविध प्रकारांनी प्रेक्षक अचंबित झाले.तर रक्षा गटाद्वारे आजेसासू सूना,नातसूना असा संपूर्ण परिवार म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचा उत्कृष्ट नमुनाच होता. मॉडर्न कॉलेज मधील प्राध्यापिकांनी नाविन्या गटामार्फत प्रत्येक राज्यानुसार साड्यांचे प्रकार दाखविले.
दहा जणींच्या ग्रुपने दहा मिनिटात विविध प्रकारच्या साड्या परिधान करणे अावश्यक होते.शिवाय साडी नेसलेलीच हवी शिवलेली नको ही महत्वपूर्ण अट असतांनाही स्पर्धकांनी पारंपारिक ,राज्यनिहाय ,विश्वनिहाय ,महाराष्र्टातील बारा बलुतेदार महिला,राज्यानुसार नववधूंच्या साड्या तर सादरीकरणात दिसल्या .13 गटातून एकशे तीस महिला स्पर्धकांनी सहभाग घेवून मनस्वी आनंद लुटला.
प्रथम क्रमांक पारंपारिक साड्यांचे आधुनिक रूप सादर करणार्या सागरिका गट त्यांना रुपये आठ हजाराचे बक्षीस सांगवी येथील अमृता सिल्क अॅण्ड सारीज् च्या संचालिका मिसे यांनी प्रदान केले.द्वितीय क्रमांकाचे बक्षीस महाराष्र्टातील बुलुतेदार स्रियांचा पेहराव केलेल्या आणि माणसाने माणसाशी माणसा सम वागावे हा संदेश देणार्या आनंदवन ग्रुपचा आला.त्यांना बक्षीस रुपये पाच हजार पेपर अार्टच्या संचालिका कल्पना भोईर यांनी दिले. तृतीय क्रमांक तालवृंद गटाने पटकवला तर त्यांचे तीन हजार रुपयांचे बक्षीस गायत्री पैठणीचे संचालक अमोल रोडे यांनी प्रदान केले.तर उत्तेजनार्थ बक्षीस कोहिनूर गटाला ज्ञानवर्धिनी टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिटयुटच्या संचालिका रूपाली देव यांनी दिले.प्रेक्षक वर्गासाठी आकर्षक अशी लकी ड्रॉ योजना नऊवार नारच्या संचालिका चैताली भोईर यांनी दिले.सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला शेडगे यांनी कार्यक्रमासाठी विशेष आर्थिक सहाय्य केले. प्रेक्षक महिलांसाठी मनोरंजक प्रश्नमंजुषेचे आयोजन सुनिता शिंदे यांनी केले
या स्पर्धेचे परीक्षण विजया मानमोडे,मिनल ठिपसे,मेघा म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले तर आभार प्रमोदिनी बकरे यांनी मानले.कार्यक्रमातील सर्वच महिलांचा उत्साह विशेष दखल घेण्याजोगा होता.