मुळशी तालुका : प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांचे आयोजन मुळशी तालुका शिवसेनेच्या वतिने करण्यात आले होते. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे तसेच जिल्ह्यातील सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.
शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ यांनी तालुक्यातील सेना पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेऊन वाढदिवसाचे औचित्य कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामधे प्रामुख्याने मुळशी तालुक्यातील आदिवाशी कातकरी समाजाला जातीचे दाखले वाटप करण्यात आले, संस्कार प्रतिष्ठान अंबटवेट येथे मतीमंद मुलांना खाऊ तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप, प्लास्टीक बंदी ला तोडगा म्हणून कापडी पिशव्या वाटप, तसेच मौजे असदे येथील मुलींच्या वस्तीगृहामधे शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थीतीत विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, भोर विधानसभा संपर्क प्रमुख दिलीप शिंदे, दत्तात्रय टेमघरे , जि,.प.सदस्य सागर काटकर, पं.समिती सदस्य सचिन साठे, विजय केदारी, जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, तालुका प्रमुख पै. संतोष मोहोळ, युवासेना अधिकारी अविनाश बलकवडे, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, वि. सेना उपसंघटक राम गायकवाड, बाळासाहेब भांडे, भाणुदास पानसरे, सुरेश मारणे, नामदेव टेमघरे, सचिन पळसकर, वैभव पवळे, शिवाजी भिलारे, नितिन चांदेरे, वैभव शितोळे सहित तालुक्यातील शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
मुळशी ग्रामिण भागातील शेतकरी ग्रामस्थ, कातकरी बांधव यांची उपस्थीती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे तालुका प्रमुख संतोष मोहोळ यांनी अभार मानले.