निर्भीडसत्ता.कॉम |
बीड :
राजकारणात नेहमी एकमेकांवर तुटून पडणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काल मात्र एकाच व्यासपीठावर आले. वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे भावंडं कायम सोबत असतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ही भावंडं परीळीतील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते.
मी शाळेतील सर्वांत हुशार मुलगी. म्हणून मी वेळेच्या अगोदर कार्यक्रमाला आले, असा टोला पंकजांनी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मारला. मग शांत भाषण करतील ते धनंजय मुंडे कसले.?
हुशार मुलगी कार्यक्रमातून लवकर निघून जाते, असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंना जोरदार चिमटा काढला. पण काहीही असो. वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे भावंडं कायम सोबत असतो, असं म्हणत त्यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला.