निर्भीडसत्ता न्यूज –
श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली 95 वर्षे अहर्निष कार्यरत आहे, या संस्थेच्या वतीने या वर्षी 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत ‘ज्युडो प्रशिक्षण शिबीर’ शिवतीर्थावर म्हणजेच ‘शिवाजी पार्क’ येथे आयोजित करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ ते ८ या वेळात शिबिरार्थींना ज्युडो ह्या खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रशिक्षण ह्या शिबिरात शिबिरार्थीना दिले जाणार आहे.
शिबिराचे संपूर्ण मार्गदर्शन रवींद्र पाटील ह्यांच्या उपस्थितीत होणार आहे. मिस्टर रविंद्र पाटील हे ब्लाक बेल्ट ची ७वी पदवी मिळवणारे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय रेफ्री आहेत. तसेच महाराष्ट्र ज्युडो असोसियेशनचे ते व्हाईज प्रेसिडेंट देखील आहेत. ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली सलग सात दिवस हे शिबीर चालणार आहे. शिबिराची वेळ ही संध्याकाळी ७ ते ८ अशी असून शिबिराच्या प्रत्येक सत्रानंतर सर्व शिबिरार्थीना पौष्टिक खुराक दिला जाणार आहे.
ह्या सात दिवसीय ज्युडो प्रशिक्षण शिबिरात ६०% गुण प्राप्त करणाऱ्या शिबिरार्थीस श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ह्या संस्थ्येत प्रवेश घेता येऊ शकतो. तर तुमची मानसिक तसेच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी हे शिबीर तुम्ही नक्की करू शकता. ह्या शिबिरात सहभागी होण्यासाठी श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ह्या संस्थेला भेट देऊन सर्व माहिती मिळवता येईल.