निर्भीडसत्ता न्यूज |
सातारा लोकसभा पोटनिवडणूक व सातारा-जावली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज माजी खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विजय संकल्प रॅलीद्वारे विराट शक्तीप्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी सुमारे तीन आठवड्यांपूर्वी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. देशातील लोकसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केल्यानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच होईल, अशी सूचना निवडणूक आयोगाने केल्यानंतर सातारच्या दोन्ही छत्रपतींनी लोकसभेची व विधानसभेची निवडणूक एकदिलाने लढविण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरला, तर शिवेंद्रराजेंनी विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज प्रांत कार्यालयात भरला.