निर्भीडसत्ता न्यूज–
पिंपरी :विक्रम पिल्ले अॅकॅडमी व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी-चिंचवड हॉकी अॅकॅडमीच्या खेळाडूंनी दसर्यानिमित्त हॉकी स्टिक, बॉल व साहित्याचे पूजन केले. त्यानंतर खेळाडूंना मिठाईचे वाटप करण्यात आले.
पालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास येथे कार्यक्रम झाला. ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले यांच्या हस्ते मैदानासह क्रीडा सामुग्रीचे पूजन करण्यात आले. या वेळी विक्रम पिल्ले अॅकॅडमीचे व्यवस्थापक व राष्ट्रीय प्रशिक्षक श्रीधरन तंबा, आंतरराष्ट्रीय खेळाडू विकास पिल्ले, प्रशिक्षक अश्विनी गायकवाड आणि खेळाडू, पालक उपस्थित होते. विक्रम पिल्ले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तंबा यांनी सुत्रसंचालन केले.