निर्भीडसत्ता न्यूज ।
शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्यास पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर या सराईताकडून साडेआठ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
समीर श्रीकांत नान्नजकर (वय ४६, रा. खंडोबा मंदीर जवळ, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलिस गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना आरोपीबाबत माहिती मिळाली त्यानुसार रोषण गार्डन, भोसरी येथे सापळा लावून त्यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने २०१७ पासून दहा ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ लाख ४८ हजार ८०० रूपयांचे २३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याल, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सपोफौ रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, कर्मचारी आप्पा लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर, मारूती जायभाये, सचिन मोरे, प्रविण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत व तानाजी पानसरे यांचे पथकाने केली आहे . अधिक तपास सपोनि गणेश पाटील करीत आहेत.