निर्भीडसत्ता न्यूज –
एसव्हीएस हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. महोत्सवात विद्यार्थी-खेळाडूंनी हिरीरिने सहभाग घेऊन खेळाचे प्रदर्शन केले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉकी क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतराष्ट्रीय हॉकी पंच आणि विक्रम पिल्ले अॅकॅडमीचे व्यवस्थापक श्रीधरण तंबा उपस्थित होते. यावेळी एसव्हीएस संस्थेचे अध्यक्ष फ्रॉन्सीस डेव्हीड, सचिव एस.ए. कंनकराज, मुख्याध्यापिका गोवरी, शिक्षण व पालक उपस्थित होते.
तंबा यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व आकाशात फुगे सोडून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाबाबत मार्गदर्शन केले. भारताचा स्टार हॉकीपटू धनराज पिल्ले याच स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.
विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक शपथ देण्यात आली. महोत्सवात हॉकी, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, धावणे, लगंडी, थ्रो बॉल आदी क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात आल्या. पर्यवेक्षिका एस. जनसम्मा यांनी सुत्रसंचालन केले.
फोटोओळ : एसव्हीएस स्कूलच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना श्रीधरण तंबा. समवेत फ्रॉन्सीस डेव्हीड, एस.ए. कंनकराज आदी.