महापौर चषक स्पर्धेत 17 वर्षे मुलांमध्ये अमृता विद्यालयाचा 3-1 ने पराभव
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
महापौर चषक ‘टिन 20’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सिटी प्राईड स्कूल संघाने अमृता विद्यालय संघाचा 3-1 गोलफरकाने पराभव करीत 17 वर्षे मुलांच्या गटात विजेतेपद प्राप्त केले. आर्यन साळगावकर याने 2 गोल नोंदवित विजयात सिंहाचा वाटा उचलला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा मासुळकर कॉलनीतील डॉ. केशवराव हेडगेवार मैदान येथे सुरू आहे. अंतिम लढतीत सिटी प्राईड स्कूल संघाच्या साळगावकर यांनी 2 गोल केले. तसेच, मोहित राऊत याने 1 गोल केला. सिटी प्राईड स्कूलच्या भक्कम बचाव फळीमुळे अमृता विद्यालयास केवळ 1 गोल नोंदविता आला. तो गोल सिद्धार्थ शर्मा याने केला.
या वेळी क्रीडा शिक्षक सोपान खोसे, लक्ष्मण माने, चंद्रशेखर कुलकर्णी, क्रीडा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भिसे आदी उपस्थित होते.