निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगरमधील अण्णासाहेब मगर स्टेडिमय येथील गोदामातील भंगार व निरूपयोगी साहित्याचा ई-लिलाव सोमवारी (दि.10) करण्यात आला. त्यातून पालिकेस विक्रमी 3 कोटी 31 लाख 12 हजार 493 महसुल मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरभरात नियमितपणे कारवाई केली जाते. विभागाने केलेल्या कारवाईत टपर्या, हातगाड्या, तीन व चारचाकी टेम्पो, पत्राशेड आणि इतर साहित्य जप्त करून नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडिमय मैदानाशेजारील गोदामात जमा केले जाते. या भंगार व निरोपयोगी साहित्यामुुळे गोदाम फुल्ल झाले होते. हे भंगार साहित्याची विक्री करून परिसरातील जागा रिकामी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
अखेर पालिका प्रशासनाचे या भंगार साहित्याचा सोमवारी ई-लिलाव केला. या लिलावात एकूण 16 टप्पे होते. त्या भंगार साहित्याचे शासकीय मुल्यांकन 1 कोटी 59 लाख 52 हजार 180 रूपये इतके होते. ई-लिलावातून एकूण 3 कोटी 31 लाख 12 हजारांचे उत्पन्न पालिकेस मिळाले आहे. ई-लिलावातून पालिकेस प्रथमच इतकी विक्रमी महसुल मिळाले आहे, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे, मुख्य लेखापरिक्षक अमोद कुभोंजकर, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, शहर अभियंता राजन पाटील, भांडार अधिकारी मुबारक पानसरे व अधिकारी उपस्थित होते.