पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आळंदी येथील कृष्णा चव्हाण याने ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’चा किताब जिंकला. पीसीएमसीचा आबासाहेब वेटम बेस्ट पोझर आणि पीएमसीचा राहुल नानक बेस्ट इन्प्रुव्हड बॉडीबिल्डर ठरला.
सुनील पाथरमल मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि.17) उत्साहात पार पडली. स्पर्धेस तरूणाईने मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते साहिल खान, ओम भुतकर, हिना पांचाळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमास नगरसेवक डब्बू आसवानी, सावल तोतानी, अॅड. सुशील मंचरकर, रमेश सुतार, रमेश तेवलानी, धनाजी बारणे, बाळासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते. पुणे विभागीय शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे संयोजन शिवसेना समन्वयक सुनील पाथरमल यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आकाश खोसे, विजय चव्हाण, रूद्र अवसरमल यांनी परिश्रम घेतले.
निकाल पुढीलप्रमाणे :
55 किलो : नवनाथ गावडे (बॉडी प्लेक्स), सलमान नावेद (हनुमान जीम), रियाज शेख (सांगवी जीम).
60 किलो : इमरान शेख (माय जीम), मंगेश बेट (के. व्ही. फिटनेस), के. एस. राव (रेंजहिल्स जीम).
65 किलो : अविनाश रासगे (फिजीक इलीट), प्रवीण गायकवाड (एम. एस. फिटनेस), नोव्हीन (रेंजहिल्स जीम).
70 किलोे : अजय सोनावणे (सोलारिस जीम), राजेश काळे (एम. एस. फिटनेस), शुभम मींद (रिजेंड फिडनेस).
75 किलो : राहुल नानक ( पीएमसी), रोहन गोगावले (एम.एस. फिटनेस), बादशहा शेख (शिवाजी व्यायाम मंडळ).
80 किलो : कृष्णा चव्हाण (आळंदी), गोपाळ देवर (सोलारीस जीम), इजाज मुलानी (गोल्ड जीम).
80 किलोवरील : सुशांत सिसोदीया (सोलारीस जीम), रवी किरण ( तोडकर हेल्थ क्लब), दीपक तांदळे (शिवाजी व्यायाम मंडळ).
किताब विजेता : कृष्णा चव्हाण ( आळंदी जीम), बेस्ट पोझर : आबासाहेब वेटम (पीसीएमसी), बेस्ट इन्प्रुव्हड : राहुल नानक (पीएमसी)