पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
तिसर्या राष्ट्रीय मास्टर्स फुटबॉल गेम्स स्पर्धेत विजेपेपद मिळविणार्या पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंचे उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते नुकतेच सत्कार करण्यात आला. शहराच्या नावलौकीकात भर टाकल्याबद्दल त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. महापालिका भवनात झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त संदीप खोत, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, अधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धा गुजरात राज्यातील बडोदरा नुकतीच पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद प्राप्त केले. या संघात शहरातील खेळाडू मोहन नायर, महेश अय्यर, सतीश अय्यर, फारुख सय्यद, सी.के.उप्पी, राजेंद्र निकम, राहुल कड, अलोक शर्मा, रवी पिल्ले, नजीर सय्यद, कुमार बालकृष्णन, जयन पिल्ले, अॅन्थोनी चावडी, श्रीकांत महाडिक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.