पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि.31) कोरोनाचे 11 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चिंचवड स्टेशन येथील इंदिरानगर झोपडपट्टी, भाटनगर, बौध्दनगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी, दत्तनगर येथील 8 महिला व 3 पुरूषांचा त्यात समावेश आहे.
शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 562 झाली आहे. त्यातील 40 रूग्ण शहराबाहेरील आहेत. वायसीएम व इतर रूग्णालयात 220 आणि शहराबाहेरील रूग्णालयात 32 कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत.