- सभापती जयश्री गिरी आणि माजी सभापती सुहास गिरी दाम्पत्याचा पुढाकार
मेढा । निर्भीडसत्ता न्यूज
जावली तालुक्याच्या सभापती जयश्री गिरी यांनी आनेवाडी विभागात अन्नदान करण्याच्या उद्देशाने मोफत शिव थाळी सुरू केल्याने गोरगरीबासाठी शिव थाळी उपयुक्त ठरत आहे . तसेच अनेक गावातील गरीबांना मोफत धान्याचे वाटप करुन अंगणवाडी ताई, आशा यांना सॅनिटायझर व महिगावातील सर्व लोकांना मास्कचे मोफत वाटत केले आहे . त्यामुळे गरिबांच्या माई म्हणून ओळख असलेल्या जयश्रीताई गिरीचे जनतेतुन कौतुक होताना दिसत आहे.
सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोच असणाऱ्या लोकांची चुल पेटणे मुश्किल झाले आहे. अशा प्रसंगी जावळीच्या सभापती जयश्री गिरी यांनी पुढाकार घेवून ज्या लोकांना दोन वेळेचे जेवन मिळणे अशक्य झाले आहे अशांसाठी शिव थाळीची योजना अंमलात आणून त्याची सुरुवात आनेवाडी येथे केली. त्यामुळे अनेक गरीब लोकांच्या जेवनाची उत्तम सोय झाली आहे .
सभापती यांनी शिव थाळीची योजना सुरू केल्या नंतर गोरगरीब जनतेच्या दारापर्यत जावून त्यांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप महिगाव, केसकरवाडी आनेवाडी आदी गावात केले आहे. कातकरी, गोसावी आदी इतर समाज बांधवांना त्या धान्याचा लाभ मिळाला आहे .
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिगावामध्ये १ हजार मास्कचे मोफत वाटप केले. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व आशाताई यांना सॅनिटायझर व मास्क यांचे वाटप केले. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांप्रदायिक आदी ठिकाणी नेहमीच माजी सभापती सुहास गिरी व त्यांच्या पत्नी सभापती जयश्री गिरी या समाज हितासाठी पुढे येत असतात. सध्या कोरोनामुळे गरिब जमता हतबल झाली असताना त्यांना आधार देण्यासाठी पुन्हा गिरी दांपत्य आ . श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गरिबसाठी पुढे आली आहेत. त्यांच्या दानशुर वृतीची सध्या जनतेत चर्चा होताना दिसत आहे.