जावली | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप खून प्रकरणी व अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदनपत्रक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे व भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी काढलेले आहे.
नागपूरच्या नरखेड मधील पिंपळ धरा गावातील युपीएससी चा विद्यार्थी तरुण कार्यकर्ता अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार कारवाई व्हावी तसेच क्राईम ब्रँचच्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या दोन्हीं गुन्ह्याची सखोल चौकशी करावी. अरविंद बनसोडे यांचा संशयास्पद मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप होत असून या हत्येचा निषेध समाजातून केला जात आहे. तसेच पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर मधील तरुणीवर प्रेम केल्याच्या रागातून तिच्या घरच्यांनी २० वर्षीय विराज जगताप याचा खून केला असून खुनातील आरोपींना ताबडतोब अटक करून विराज जगतापच्या हत्येप्रकरणी मारेक-र्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व जबरीखुनाचा गुन्हा दाखल करावा व अन्यायग्रस्त कुठंबाला पोलीस संरक्षण द्यावे.
महाराष्ट्रात मागासवर्गीय समाज्यावर होणारे अन्याय अत्याचारांचे प्रमाण अधिक वाढत चालले असून गुन्हेगारांवर कडक कारवाही करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी त्यामुळे अशा घटनांना आळा बसेल व वंचित, अल्पसंख्याक समाज सुरक्षित राहील अशी मागणी रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे तालुका कार्यकारणी व जावली तालुक्यातील आंबेडकरी समाज्याच्या वतीने करण्यात आली आहे.