पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे 3 महिला व एका पुरूषाचा उपचारादरम्यान रविवारी (दि.5) मृत्यू झाला. तर, आज शहरात कोरोनाचे 336 जण पॉझिटिव्ह आढळून आले.
केशवनगर, चिंचवड येथील 68 वर्षीय पुरूषाचा, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील 49 वर्षीय महिलेला, क्षितीजनगर, प्राधिकरण येथील 62 वर्षीय महिलेचा आणि बोपखेल येथील 54 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 93 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 192 पुरूष व 144 महिला आहेत. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 हजार 389 वर पोहचली आहे. तर, वायसीएम, भोसरी व इतर रूग्णालयात 1 हजार 6 74 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 174 कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बरे होणार्यांची संख्या 2 हजार 765 इतकी झाली आहे. एकूण 984 कोरोना संशयितांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज प्राप्त झालेले 359 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.