- 281 जण कोरोनातून बरे
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि.14) कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात तब्बल 557 कोरोनबाधित रूग्ण आढळून आले.
कोरोनाबाधित 281 रूण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. थेरगावातील 30 वर्षीय तरूणी, इंद्रायणीनगरमधील 69 वर्षीय पुरूष, कासारवाडीतील 64 वर्षीय पुरूष, चिखली घरकुलातील 65 वर्षीय महिला, चिंचवडमधील 42 वर्षीय पुरूष, मोशीतील 53 वर्षीय महिला, नेहरूनगरमधील 50 वर्षीय पुरूष, तळवडेतील 57 वर्षीय पुरूष, आनंदनगर झोपडपट्टीतील 48 वर्षीय पुरूष, तळेगाव रोड येथील 58 वर्षीय पुरूष आणि पुणे शहरातील 80 वर्षीय पुरूष या 11 जणांचा कोरोनावरील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 173 जणांचे बळी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 706 झाली आहे. वायसीएम, भोसरी, पालिका व खासगी रूग्णालयात 1 हजार 942 जणांवर उपचार सुरू आहेत.आज 281 कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे होणार्यांची एकूण संख्या 5 हजार 284 झाली आहे.