पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 683 जण रविवारी (दि.26) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर, उपचारादरम्यान 6 पुरूष व 3 महिला असे एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. त्यात पाषाणमधील 30 वर्षाच्या तरूणाचाही समावेश आहे. तर, आज 753 रूग्ण बरे झाले. शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 16 हजार 315 झाली आहे. सक्रिय 3 हजार 427 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 36 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
चिंचवड येथील 65 वर्षीय महिला आणि 54 व 64 वर्षीय 2 पुरूष, वाकड येथील 65 वर्षीय महिला, वाल्हेकरवाडी येथील 55 वर्षीय पुरूष, निगडी येथील 52 वर्षीय पुरूष, चिखली येथील 86 वर्षीय पुरूष, मोरवाडी येथील 71 वर्षीय महिला आणि पुण्यातील पाषाण येथील 30 वर्षीय युवकाचा असे एकूण 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 359 झाली आहे.
एकूण 753 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले. त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 10 हजार 911 रूग्ण बरे झाले आहेत. आज 3 हजार 387 संशयितांचे घशा व नाकातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 2 हजार 995 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.