पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या 798 झाली असून, एकूण संख्या 25 हजारांचा पार झाली आहे. उपचार्यादरम्यान 16 जणांचा मृत्यू झाला. तर, कोरोनाबाधित 301 जण बरे झाले.
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 25 हजार 425 झाली आहे. रूग्णालयात 3 हजार 970 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात कोरोनाबाधित 301 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 17 हजार 407 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुनावळे, दापोडी, भोसरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, मोशी, सांगवी, निगडी, पिंपरी, आकुर्डी, किवळे तसेच, चाकण येथील 16 रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 521 रूग्णांचा बळी गेला आहे.
एकूण 1 हजार 419 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 192 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण 1 लाख 12 हजार 976 जणांचे स्वॅब आतापर्यंत तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 86 हजार 199 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप, 1 हजार 671 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.