पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान चौकातील निगडी ते देहूरोड मार्गावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून वाहतूक रहदारी सुरू करावी, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी महापालिका प्रशासनच्या निषेध करून घोषणाबाजी करण्यात आले.
येथील उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर व वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. या कामांमुळे नागरिकांना व वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटरचा अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालक वैतागले आहेत. त्यामुळे पूर्ण झालेला उड्डाणपुल वाहतुकीस खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या वेळी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी केली होती. त्या मागणीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निगडी येथे हे आंदोलन करण्यात आले.
सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सचिन शिंदे, स्वप्निल पवार, भरत पवार, राम ताटे, अक्षय सावंत, गोकुळ सातपुते, पिट्टू लोंढे, विकास कांबळे, पप्पू हातागळे, रमेश वाघमारे, जावेद शेख, राजू शेख, दीपक अडागळे, सागर मोरे, निखिल वावहरे, वाहीद मुकरताल, राजू पाटोेळे, संजय घोलप, फुआराम चौधरी, नवनाथ लांडे महेश मगर आदींनी सहभाग घेतला. लवकरात लवकर उड्डाणपुल वाहतुकीस खुला न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.