पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाविषाणू संसर्ग झपाट्याने कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. हा वेग गुरूवारी (दि.22) ही कायम होता. कोरोनाबाधित 193 रूग्ण बरे झाले तर, 182 बाधितांची नोंद झाली. कोरोनाबाधित 193 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 82 हजार 510 झाली आहे. शहरात कोरोनबाधितांची एकूण संख्या 86 हजार 296 वर पोहचलीआहे. सक्रिय 1 हजार 336 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील रूग्णालयात 317 रूग्ण दाखल आहेत. दोन हजार 217 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आज घेण्यात आले. तर, 2 हजार 904 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 771 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. उपचारादरम्यान, निगडी, कासारवाडी, चिंचवड, काळेवाडी, दिघी, बोपखेल येथील रहिवाशी असलेल्या 6 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 499 रूग्णांचे निधन झाले आहे. शहराबाहेरील 2 रूग्णांचा मृत्यू झाला असून, ती एकूण संख्या 618 आहे.