- फ्रेंड झोन ते बॉयफ्रेंड झोनचा अनोखा प्रवास आता हिंदी भाषेत
मुंबई : निर्भीडसत्ता न्यूज
लॉकडाऊनच्या काळात थिएटर बंद पडली होती आणि काही काळ टेलिव्हिजनवर देखील शोज नसल्याने प्रेक्षकांचा ओघ हा ओटीटी प्लॅटफॉर्म अर्थात डिजिटल माध्यमाकडे जास्त वळला आहे. नुकतीच कॅफेमराठी प्रस्तूत आणि प्रविण काळोखे दिग्दर्शित “टिक टॅक टाॅ” ही वेबसिरिज मराठी भाषेत रिलिज झाली आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे आता ही वेबसिरिज हिंदी भाषेत देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
टिक टॅक टो’ म्हणजे काय तर फुल्ली गोळ्याचा खेळ. हा खेळ खेळायला वाटतो सोपा परंतु हा खेळ खेळणं हे अत्यंत डोक्याचं काम आहे. खेळ प्रेमाचा वाटतो खूप सोपा परंतु तो खेळ खेळणं जरा रिस्कीचं असतं. कारण तुमची एक चुकीची फुल्ली तुमच्या वर फुल्ली मारू शकते किंवा तुमचा एक चुकीचा गोळा तुमचा कायमचा घोटाळा करू शकतो. असचं काहीसं चित्र या वेबसिरीज मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या सिरिजमध्ये हिंदी मालिकांमध्ये आपल्या अनोख्या आणि आकर्षक भुमिकांमुळे नावजलेली अभिनेत्री जयती भाटिया या नायर मॅडमच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोबतच मकरंद नावाचा एक अतरंगी आणि वेगळ्या प्रकारचं शिक्षण देणारा प्रोफेसर हे पात्र चिन्मय उदगीरकरने या वेबसिरीज मध्ये साकारले आहे. तर नेहमी सगळ्यांना खळखळून हसवणारे आनंद इंगळे एका धमाल विनोदी कॉलेज प्राचार्याच्या भूमिकेत आहेत. एकंदरीत कॉलेज जीवनाचे भावविश्व दर्शवणारी हि वेब मालिका सध्या तरुणांच्या मनात घर करते आहे.
हि वेबसिरीज एम.एक्स.प्लेअर, व्ही.आय. मुव्हीज, व्होडाफोन प्ले म्हणजेच व्हीआय मुव्हीज, आणि एअरटेल एक्स्ट्रीमवर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत मोफत पाहू शकता.