पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील चित्रपटगृह, नाट्यगृह तसेच, मोकळ्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार (दि.22) पासून घेण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांच्या खंडांनंतर चित्रपटगृहाचा पडदा उघडणार आहे.
कोरोना नियमांचे पालन करून नाट्यगृह व चित्रपटगृहे खुले करण्यास परवानगी दिली आहे. प्रेक्षागृहात केवळ 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. प्रेक्षागृह व स्वच्छतागृह नियमितपणे स्वच्छ करून निजुर्तक करण्याचे आदेशात म्हटले आहे. प्रेक्षकांना ऑनलाईन, क्युआर कोड, ई-वॉलेटद्वारे तिकीट विक्री करावी. गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या प्रेक्षकांना प्रवेश द्यावा. आजारी प्रेक्षकांना प्रवेश देऊ नये. नियमांचे भंग करणार्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.