- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; सुप्रिया वाल्हेकर व भरत वाल्हेकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक 25 मधील महिला, नागरिकांसाठी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती सुप्रिया वाल्हेकर व भरत वाल्हेकर यांनी दिली. यावेळी चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि सागर कारंडे हे विशेष आर्कषण असणार आहे.
वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक 25 मध्ये मंगळवार (दि.8 मार्च) रोजी सायंकाळी 5 वाजता शुभम गार्डन या ठिकाणी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम होणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक सचिन चिंचवडे, श्याम वाल्हेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
गेली दोन वर्ष करोनाचे संकट पिंपरी-चिंचवड शहरावर होते. त्यामुळे सर्व नागरिक, महिलांना धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना जाता आले नाही. शहरात सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध होते. पण, आता करोनाचे रुग्ण कमी झाल्याने जनजीवन पुर्व पदावर येत असून शासनाचे करोना नियमांचे निर्बंध देखील पुर्णपणे उठले आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नागरिक व महिलांसाठी ‘चला हवा येऊ द्या’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, तसेचे सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया भरत वाल्हेकर ह्या सर्वांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सर्वांनी मास्क व सोशल डिस्टंन्स नियमांचे पालन करावे, असे आवाहनही सुप्रिया वाल्हेकर व भरत वाल्हेकर यांनी केले आहे.