पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
इटली येथे पुढील महिन्यात होणार्या वर्ल्ड पॅराअॅथलेटिक्स-ग्रॅण्ड प्रिक्स इटालियन ओपन 2022 स्पर्धेसाठी साई स्पोर्टस् अकॅडमीच्या दत्ता वरकड याची निवड भारतीय संघात झाली आहे.
वरकड याची 100 मीटर धावणे व लांब उडी या प्रकारात निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष रामदास कुदळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव चंद्रशेखर कुदळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी संघटनेच्या खजिनदार मनीषा जाधव, उपाध्यक्ष रुस्तुम पठाण, संजय सातव, मंगेश पवार, उमेश जाधव उपस्थित होते. तो पालिकेच्या इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात सराव करतो.